Friday, April 26, 2024

/

शोध नगरसेवकाचा

 belgaum

बेळगाव दि २८ :चव्हाट गल्ली येथील नगरसेवक पुंडलिक परीट सध्या गायब आहेत. यामुळे गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या शोधासाठी एक फलक लावला आहे. नगरसेवक हरवला आहे, कोठे असाल तेथून निघून या असा फलक लावण्यात आला आहे. आमचा नगरसेवक कुणाला सापडल्यास तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या महापालिका निवडणुकीची पळवापळवी सुरु आहे, नगरसेवक पुंडलिक परीट दुसऱ्या गटात सामील झाले की काय या संशयातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गेल्या चार दिवसापूर्वी चव्हाट गल्लीतील पंच मंडळ आणि युवकांनी परिट यांच्याकडून मराठी गटालाच मतदान करू असे लेखी हमी पत्र लिहून घेतले होते. सध्या मराठी अगर सेवाकात २४ आणि ८ असे दोन गट आहेत .

नगरसेवकानो जरा सांभाळून

सध्या स्थीतीत मराठी भाषिक महापौर करणे काळजी गरज असल्याने मराठी नगर सेवकांनी फुटी च राजकारण केल्यास त्यांना अंगलट येऊ शकतय असा इशारा बापट गल्लीतील कालिका देवी युवक मंडळान दिला आहे. मागील सभागृहात कंग्राळ गल्ली आणि शास्त्री नगर भागातील एकूण ५ नगर सेवकांनी माजी आमदार समर्थकास मतदान केले होते त्यामुळे संतप्त मराठी भाषिकांनी त्या माजी नगरसेविकेच्या घर समोर आंदोलन करून घरावर हल्ला देखील केला होता जर का या निवडणुकीत असला प्रकार घडला तर नगर सेवकांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे नगर सेवकानो जरा सांभाळून!!!!!!!पारिट सध्या ८ जणांच्या मराठी नगरसेवका सोबत असल्याची माहिती मिळत आहे  सोशल मिडिया वर चव्हाट गल्ली च्या नगरसेवकाची चर्चा रंगू लागली आहे

 belgaum

pundlik parit belgaum corporator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.