बेळगाव दि २ : सरकारच्या करंट्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून बहु संख्य मराठा समाज हा शेतकरी बांधव आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हमी भावाला योग्य दर मिळालाच पाहिजे रामनाथ आयोगाच्या शिफारसी नुसार उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा हे सूत्र लागूच केल पाहिजे. असे मत कोल्हापूर मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत राव मुळीक यांनी मांडले .वडगाव कारभार गल्लीतील मंगल कार्यालयात जुने बेळगाव आणि वडगाव भागातील मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा जागृती बैठकीत बोलत होते . गुरुवारी रात्री या बैठकिच आयोजन करण्यात आल होते यात हजारो लोकांनी सहभाग दर्शविला होता.
मुळीक पुढे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगावातून पाच हुतात्मे आहेत त्यामुळेच महाराष्ट्र अखंड आहे म्हणूनच कोल्हापूर आणि मुंबईच्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात अग्रक्रमाने बेळगाव प्रश्नाला जागा दिली आहे . यासोबत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आर्थिक निकष किंवा समान नागरी कायदा मराठा आरक्षणासाठी बाधक नसून मराठा आरक्षण हा मराठ्यांना न्याय देण्यासारखे आहे .यावेळी कोल्हापूरच्या ८ वर्षीय छोट्या सई पाटील हिने सर्वांची मार्गदर्शन करत मन जिंकत लाखोंच्या संख्येने मोर्चात सामील व्हा अस आवाहन केल यावेळी रंगराव पाटील यांनी देखील आपले विचार मांडले .वडगाव आणि जुने बेळगाव येथील लोकांनी कोल्हापूर ला ज्या पद्धतीने गेलो त्यापेक्षा अधिक जोमाने बेळगावातील मोर्चात लोक सामील होतील अस आश्वासन दिल यावेळी शेतकरी वर्ग मोठय संख्येने उपस्थित होता . पूर्ण वडगाव , जुने बेळगाव पंच मंडळीनी मोर्चात सामील होणार असा पाठींबा जाहीर केला