बेळगाव दि १९ : बेळगाव रेल्वे स्थानकातील प्री पेड ऑटो रिक्षा केंद्र गेले तीन महिने बंद अवस्थेत आहे याकडे जिल्हाधिकारी आन परिवाहन विभागाने दुर्लक्ष केल आहे . रेल्वे स्थानका बाहेरील प्री पेड ऑटो रिक्षा केंद्रातील संगणक बंद पडल्याने परिवाहन विभागास वारंवार तक्रार देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे .
बेळगाव बस स्थानक आणि रामदेव प्री पेड ऑटो केंद्र सुरु व्हायच्या अगोदर रेल्वे स्थानकावर प्री पेड ऑटो केंद्र चालू केल होत मात्र गेले तीन महिन्या पासून बंद अवस्थेत आहे . अपंग असलेले परशराम मन्नुरकर हे केंद्र चालवितात हे बंद पडल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. ऑटो चालकांचा गैर व्यवहार बंद होऊन पारदर्शकता यावी आणि अपंगाना रोजगार मिळावा या साठी प्री पेड रिक्षा केंद्र सुरु केल होत ते सध्या बंद आहे .