बेळगाव दि २५:मराठी क्रांती मोर्चात मी बेळगावचा आणि बेळगाव महाराष्ट्राचे असा मजकूर असणारा टी शर्ट विकतेवेळी बेळगाव पोलिसांनी अटक केलेल्या शहाजी राजे भोसले वय(२५) राहणार वाळवा कोल्हापूर याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
शनिवारी बेळगाव जिल्हा सत्र आठव्या न्यायालयाने ५० हजारांचा वयक्तिक बॉंड आणि तितक्याच रक्कमेच्या दोन जामीनदार हमीवर न्यायाधीश मोहम्माद्गौस मोइनुद्दिन पाटील यांनी जामिनावर मुक्तता केली आहे . मराठी आणि मराठा मोर्चा जन जागृती साठी गेल्या १० फेब्रुवारी रोजी शहरातील संभाजी चौकात मी बेळगावचा आणि बेळगाव महाराष्ट्राचे असा मजकूर असलेला टी शर्ट विकते वेळी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने जामिन मंजूर करताना शहाजी वर दोन महिने बेळगाव शहर न सोडण्याची अट घालण्यात आली असून दोन महिने प्रत्येक सोमवारी खडे बाजार पोलीस स्थानकात सकाळी दहा ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावण्याची अट देखील घालण्यात आली आहे. एकीकरण समितीचे वकील महेश बिर्जे यांनी शहाजी भोसले जामीन मंजूर करून घेण्यासाठी विशेष परिश्रम केले . सायंकाळी ७ वाजता हिंडलगा कारागृहातून शहाजी ची मुक्तता करतेवेळी एकीकरण समिती चे मनोहर किणेकर,आर आय पाटील ,रत्न प्रसाद पवार,अनिल हेगडे, राजू मर्वे, बाबाजी देसुरकर,नेते युवा कार्यकर्ते उपस्थित होते.