बेळगाव दि २५ :जीव वाचवण्यात रक्तदानाचे महत्व यावर जन जागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव च्या वतीने स्केटिंग रिले आणि रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आल होत. आंतर राष्ट्रीय स्तरावर रोटरी क्लब मानवता सेवेत ११२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तान बेळगाव जिल्हा रोरल स्केटिंग अकादमी,के एल ई आणि रोटरी क्लब च्या वतीने या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल होत .
३ ते २० वयोगटातील स्केटिंग खेळाडूनी हातात पर्यावरण प्रदूषण वाचवा, पाणी वाचवा असे फलक घेत ११२ कि मी अंतर स्केटिंग रिले पूर्ण केला. महावीर ब्लड बँक च्या सहयोगाने रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आल होत . यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ सतीश धामणकर, रोटरी चे डॉ विनय पै रायकर, वेंकटेश देशपांडे, मुकुंद बंग,विशाल कुलकर्णी,अक्षय कुलकर्णी ,राहुल पाटील आदी उपस्थित होते .