यशस्वी माणुस बनण्यापेक्षा मूल्यवान माणूस बना
प्रल्हाद वामनराव पै यांच मत
आश्रयालयाचे उदघाटन शांताई सेवाभावी पुरस्कारांचेही वितरण
प्रतिनिधी
बेळगाव दि 8 : यशस्वी माणूस बनण्यापेक्षा मूल्यवान माणूस बनण्याकडे लक्ष्य द्या. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करायला शिका, चांगले वागा बोला आणि शिका, स्वार्थी बनू नका. असे उपदेश देताना शांताई हे आनंद लुटण्याचं चांगलं उदाहरण आहे. असे प्रतिपादन जीवन विद्या मिशन चे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.
शांताई वृध्दाश्रमाच्या आवारात कै जी एस चौगुले यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या नूतन आश्रयालयाचे उदघाटन बुधवारी झाले.
पोलीहैड्रोन फौंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या भोजनकक्षाचे उदघाटन उद्योजक सिद्धार्थ सुरेश हुंदरे यांच्या हस्ते झाले.यानंतर झालेल्या कार्यक्रमात पै यांनी उपस्थित नागरिक आणि विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी वर्गास मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त टी जे कृष्णभट्ट, भरतेश शिक्षण समूहाचे सेक्रेटरी राजीव दोड्डन्नावर, केएलइ विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही डी पाटील, जैन समूहाचे संचालक आर जी धारवाडकर, उद्योजक दिलीप चिटणीस, कांचन प्रभाकर पाटील, शांताई पाटील, चेअरमन विजय पाटील आणि व्यवस्थापक नागेश चौगुले होते.
प्रारंभी दिपप्रज्वलन झाले.त्यानंतर शांताई च्या वतीने ५ जणांना सेवाभावी पुरस्कार देण्यात आले.रक्तदान आणि देहदानाची जागृती करणारे कार्यकर्ते पुरुषोत्तम पटेल, धाडसी आणि सेवाभावी पोलीस अधिकारी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी आर गडडेकर, सेवाभावी वकील महेश बिर्जे, पत्रकार सुभानी मुल्ला आणि प्रामाणिक पणे डॉक्टरी पेशा सांभाळणारे डॉ भूषण सुतार आदींचा यामध्ये समावेश होता. जीवन विद्या मिशन चे प्रल्हाद वामनराव पै यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन हा गौरव झाला.
११७ वर्षांच्या आनंदीबाई शेणवी, ९६ वर्षांच्या नलिनी परुळेकर, ८२ वर्षीय विमल कणेरी, ८० वर्षीय प्रभाकर देसाई, ८६ वर्षीय मधुसूदन पाटील आदींचाही विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर प्रल्हाद पै यांचे व्याख्यान झाले.
विजय पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर नागेश चौगुले यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात महाविद्या लयीन विध्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमाला बेळगाव आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.