बेळगाव दि ९ : १६ रोजी होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्याच्या संयोजकांना जमीनदारांसह हमीपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. ही प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. आता एकाच लक्ष क्रांती मोर्चाचे आहे.
प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नेताजी जाधव, प्रकाश पाटील, सुनील जाधव, राजेंद्र मुतगेकर, गुणवन्त पाटील यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख करून भाषिक तेढ निर्माण होऊन शांतता भंग झाल्यास तुम्ही जबाबदार असल्याचे हमीपत्र देण्याची अट घातली होती. त्याबद्दलची सारी पूर्तता करण्यात आली. यावेळी वकील म्हणून अड सुधीर चव्हाण, अड महेश बिरजे, अड अमर येळ्ळूरकर आदींनी काम पहिले .