बेळगाव दि ७ : बेळगाव महापालिकेच्या महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे सह आयुक्तांना नवीन वेरना कार मिळणार आहे. महा पालिकेच्या वतीने एका आठवड्यात या वेरना कंपनीच्या तीन कार खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे .
एका वेरना कारची किंमत ६ लाख ७० हजार इतकी असून तिन्ही कार खरेदी करण्यासाठी महा पालिकेच्या वतीन कंपनी ला पैसे भरण्यात आले असून आगामी एका आठवड्यात महा पालिकेच्या आवारात नवीन कार दिसतील . महापौर सरिता पाटील यांनी नवीन कार मिळावी यासाठी आंदोलन करत दुचाकी वरून महा पालिकेला येत होत्या तर उपमहापौर संजय शिंदे हे सरकारी वाहनाचा त्याग करत आपल्या खासगी गाडीने फिरत होते . एका महिन्यात महपौर उपमहापौरांचा अवधी संपणार असल्याने नवीन कारचा जास्त नवीन महापौरांना होणार आहे .