Tuesday, April 23, 2024

/

जखमींना हॉस्पिटलला पोचवून प्रकाश हुक्केरी यांनी दाखविली माणुसकी

 belgaum

बेळगाव दि १२ : आज काल च्या युगात सगळे व्ही आय पी आपापल्या थाटात माटात वागत असतात आपापल्या कामात व्यस्त असतात मात्र बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी चे कॉंग्रेस खासदार प्रकाश हुक्केरी यांनी माणुसकीच दर्शन घडवील आहे . अपघातात जखमी झालेल्यास स्वता च्या कार मधून हॉस्पिटल मध्ये पोचवून त्यांनी पुन्हा एकदा आपण जनतेचा चेहरा आणि लोकप्रिय का असल्याच दाखवून दिलय

आज सकाळी पुणे बंगलोर रोडवर इटगी क्रॉस जवळ कृजर आणि ट्रकमध्ये समोर समोर धडक बसल्याने झालेय अपघातात कृजर मधील एक जन जागीच ठार तर चार जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती याच रस्त्यावरून खासदार हुक्केरी प्रवास करत होते त्यांनी सर्व जखमींना आपल्या गाडीतून नेऊन कित्तूर जवळील एका खाजगी हॉस्पिटल पर्यंत पोचविल . इटगी क्रॉस जवळ झालेल्या या अपघातात सत्यव्वा  पुजारी ही महिला जागीच ठार झाली तार अन्य ४ जन जखमी झाले होते .  हुक्केरी यांनी स्वत जखमींना हॉस्पीटला ला भर्ती करून विचारपूस करून माणुसकीच दर्शन घडवल आहे .

prakash hukkeri

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.