बेळगाव दि ३ :कपिलेश्वर उड्डाणपूल शेजारी सर्व्हिस रस्ता तयार करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेले मार्किंग चे काम आज सकाळी उरकण्यात आले. मनपाच्या शहर अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर आपल्या पथकासह सकाळी ७ वाजताच या भागात हजर होत्या.
गुरुवारी हे काम रहदारी मुळे अडले होते. यामुळे शुक्रवारी सकाळीच ही मोहीम राबविण्यात आली. पाटील गल्ली व कपिलेश्वर रोड अशा दोन्ही रस्त्यांचे मार्किंग करण्यात आले. यावेळी काही नागरिकांच्या विरोधाचाही सामना मनपा पथकाला करावा लागला.
ब्रिज उभारणी नंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी पर्याय म्हणून या सर्व्हिस रस्त्याचा मार्ग निवडण्यात आला आहे. दरम्यान मालमत्ता हटविण्यास विरोध होत असल्याने मनपाची पुढील भूमिका काय असेल हे अध्याप स्पष्ट झालेले नाही