बेळगाव दि १६ : मराठा क्रांती मोर्चास अभूतपूर्व यश मिळाल अपेक्षे पेक्षा अधिक पटीने मोर्चा यशस्वी झाला मात्र काही नेत्यांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला . संयोजकांनी सुरुवातीलाच आचार संहिता घालून दिली होती मात्र फलक लावण्यापासून स्टेज वर चढण्या पर्यंत अनेकांनी प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न केला.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेने देखील आचार संहितेच पालन केल नाही डिजिटल फलकावर शिक्षण संस्थेच्या संस्थापकांचा फोटो छापला तर दुसरीकडे शिव सेनेच्या नावावर पब्लिसिटी घेणारे हनमंत मजुकर यांनी ही आपल्या पक्षाचा फोटो लावला . सभेच्या मुख्य मंचावर अनेक नेते जात होते आणि पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळ पाहिल्यास बेळगावातील स्थानिक वर्तमान पत्रांनी कथाकथित चढवून ठेवलेल्या या नेत्यांची एकदा काढलेली बरी अशी चर्चा कार्यकर्ते करताना दिसत होते .