बेळगाव दि ११ : सकल मराठा समाजाच्या मराठी मोर्चा जन जागृती साठी सोमवारी १३ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता शिवाजी चौक सांबरा येथे पूर्व भागाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय
मुतगा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पुर्वभावी बैठकिच आयोजन करण्यात आल होत . बेळगाव बागलकोट मार्गावरून मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांना अल्पोपहार पाणी आणि पार्किंग सुविधा देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. बसवन कुडची आणि मुतगा येथे पार्किंग सुविधा देण्याचे ठरविण्यात आले . मोर्चाची जनजागृती करण्यासाठी गाव निहाय सभा प्रचार फेऱ्या घेण्याचे ठरविण्यात आले यानुसार कणबर्गी तारीहाल सांबरा आणि सुळेभावी भागातील मराठा उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले .