बेळगाव दि १ : १७ फेब्रुवारी बेळगावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जन जागृती साठी गुरुवारी खानापूर शिव स्मारक आणि वडगाव अश्या दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत . दुपारी दोन वाजता खानापूर येथील शिव स्मारकात तर सायंकाळी ६ वाजता वडगाव येथील नरवीर व्यायाम शाळा कारभार गल्ली वडगाव येथे जाहीर सभेच आयोजन करण्यात आल आहे . या दोन्ही सभांना कोल्हापूर हून वसंतराव मुळीक ,शाहीर शंकर राव पाटील याचं मार्गदर्शन लाभणार आहे या शिवाय कोल्हापूर मधील मराठा क्रांती मोर्चात ज्या पाच लहान मुलीनी भाषण केल होत त्यापैकी सई पुंडलिक पाटील हि मुलगी दोन्ही सभा मध्ये भाषण करणार आहे अशी माहिती क्रांती मोर्चा प्रवक्ते गुणवंत पाटील यांनी दिली आहे .
Trending Now
Less than 1 min.