बेळगाव दि २६: : एकी साठी दिवसेदिवस मराठी नगरसेवकावर दबाव वाढतच चालला आहे वकील उद्योजक माजी नगरसेवक आणि युवक कार्यकर्त्या बरोबर आता पत्रकारांनी देखील या मराठी नगर सेवकांना एकी राखण्याचे आवाहन केल आहे . महापौर उपमहापौर निवडणुकीत ३२ मराठी भाषिक नगरसेवकांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे आणि मराठी भाषिक महापौर उपमहापौर निवडावा अस आवाहन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघटनेन केल आहे .
रविवारी मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यकारणीत हा ठराव करण्यात आला बैठकीच्या अध्यक्ष स्थानी कृष्णा शहापूरकर उपस्थित होते .सध्या सीमा प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्य न्यायालयात सुरु आहे यावेळी बेळगाव शहरात मराठी भाषिक महापौर उपमहापौर होणे गरजेचे आहे यामुळे सीमा प्रश्नाच्या खटल्यास बळकटी मिळेल त्यामुळे मराठी निवडण्यासाठी नगरसेवकांनी एकी राखावी अस पत्रक पत्रकार संघटनेने काढल आहे . या बैठकीस कार्यवाह प्रकाश माने, महेश काशीद ,सुहास हुद्दार,शेखर पाटील प्रकाश काकडे ,अनंत लाड गुरुनाथ भाद्वन्कर, सदानंद सामंत आदी उपस्थित होते