बेळगाव दि २६ :महापालिकेत मराठी भाषिक महापौर उप महापौर करण्यासाठी नगरसेवकांच्या दोन्ही गटात रविवारी चर्चेच्या फेऱ्या सुरूच राहिल्या मात्र अध्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही .
समविचारी आणि सत्ताधारी अश्या दोन गटात विभागल्या गेलेल्या मराठी नगरसेवकात एकी व्हावी यासाठी दबाव गटाने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. युवा कार्यकर्ते, उद्योजक, वकील ,माजी नगरसेवकानी याबाबत पुढाकार घेतला असून रविवारी दोन्ही गटातील प्रमुख नगर सेवकांची दोन वेळा बैठक झाली. गेल्या दोन दिवसापूर्वी एकमेकात चर्चेला तयार नसलेले नगरसेवक दबाव गटामुळे चर्चा करत आहेत आणि लवकरच तोडगा निघेल असा आशावाद एका जेष्ठ नगरसेवकाने व्यक्त केलाय.
एका गटाला महापौर पद,तर दुसऱ्या गटाला उपमहापौर पद चार स्थायी समित्या आणि गट नेता अशी देवाण घेवाणीची चर्चा सुरु आहे. आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात कॅम्प येथील कार्यालयात सत्ताधारी गटाच्या २२ नगरसेवकांची बैठक झाली या बैठकीस समविचारी गटाचे नगर सेवक मोहन बेळगुंदकर स्वत होऊन हजर झाले तर चव्हाट गल्लीतील नगरसेवक पुंडलिक परिट यांना चव्हाट गल्ली पंच मंडळीनी समविचार गटाला सोडून सत्ताधारी गटाकडे आणून बसविले. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे २४ नगरसेवक आणि समविचारी कडे ८ नगरसेवक संख्याबळ झाल आहे . रविवारी दोन्ही गटाना महापौर पद आपल्या कडे ठेवायचे असल्याने चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती मात्र सोमवारी यात तोडगा निघणार आहे या नन्तर सर्व ३२ नगर सेवक अज्ञात स्थळी रवाना होणार आहेत .