बेळगाव दि ७ : 17 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या सकल मराठा क्रांती (मूक) मोर्च्याच्या तयारीसाठी आज सोमवार ता, 6 रोजी रात्री 8-00 वाजता मण्णूर गावात मराठी संवर्धन सांस्कृतीक मंडळाच्या वतीने जन जागृती फेरी काढण्यात आली .
मराठी सांस्कृतिक मंडळान जाहीर केल्या प्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागात जन जागृती फेरी दररोज रात्री काढण्यात येणार आहेत . संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष मधू बेळगावकर , खजिनदार आर एम चौगुले , यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अशोक पाटील, मदन बामणे ,चिटणीस पुंडलिक पावशे , महादेव पाटील , पियुष हावळ, यांनी मण्णूर गावात जागृती फेरी काढली. प्रत्येक गल्लो गल्लीत जाऊन मराठा मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले . यावेळी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,