बेळगाव दि १३ : लाखोच्या मराठी क्रांती मोर्चात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला आघाडीच्या स्वयं सेविका देखील सिद्ध राहतील अशी ग्वाही एकीकरण समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी दिली आहे .
मोर्चाच्या पाश्वभूमीवर मारुती मंदिरात महिला आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी महापौर सरिता पाटील, नगरसेविका रूपा नेसरकर ,सुधा भातकांडे देखील उपस्थित होत्या. क्रांती मोर्चात महिला आघाडीच्या वतीने व्यापक जनजागृती करण्यात आली आहे महिला आघाडीच्या वतीने पार गावाहून आलेल्या साठी दही भात वितरण करण्यात येणार आहे अस देखील किल्लेकर म्हणाल्या . यावेळी महापौर सरिता पाटील यांनी महिलांची उपस्थीत लक्षणीय असली पाहिजे यासाठी आपण काम करून मोर्चा यशवी करूयात असे म्हणाल्या . यावेळी नगरसेविका सुधा भातकांडे आणि इतर महिला देखील आपले विचार मांडले .