बेळगाव दि१२:सकल मराठा समाजाच्या वतीने १६ फेब्रुवारी ला आयोजित मराठी मोर्चा साठी कोल्हापूर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांना आमंत्रण दिल आहे .
बेळगाव मराठा मोर्चा संयोजकांच्या विनंतीस मान देऊन खासदार संभाजी राजे आणि महापौर हसीना फरास यांनी मराठा मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिल आहे. यावेळी संयोजकांनी शाहू महाराज यांची देखील भेट घेतली. माजी महापौर बाबुराव फरास यांनी विध्यमान महापौरा सह सपत्नीक बेळगाव मोर्चात सामील होणार असल्याच आश्वासन दिल . बेळगाव हून कोल्हापूरला गेलेल्या शिष्ट मंडळान अखिल भारतीय महा संघ कोल्हापूर मेळाव्यात कोल्हापुरातील लोकांना बेळगाव मोर्चात सामील होण्याच आवाहन केल.