Monday, December 23, 2024

/

आचार संहितेचे नियम प्रत्येकाने तंतोतंत पाळा -वकील सुधीर चव्हाण

 belgaum

बेळगाव दि १२ : इतिहासात मराठ्यांना सगळे दचकून राहायचे मात्र आजच्या घडीला मराठा समाज सगळ्याचे अन्याय सहन करत आलेला आहे त्यामुळे आगामी १६ फेब्रुवारीला क्रांती मोर्चा निमित्य मराठ्यांना ताकत दाखवून द्यायची संधी आलेली आहे . संपूर्ण सीमा भागातील मराठी जनतेची एकीची वज्रमुठ या निमित्ताने दिसली पाहिजे अस मत  वकील सुधीर चव्हाण यांनी व्यक्त केल आहे .

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे चव्हाट्यावर  क्रांती मोर्चा जनजागृती सभेच आयोजन करताना बोलत होते. यावेळी गावातील जेष्ठ तमन्ना पाटील ,राजकुमार पाटील गोपाल पाटील यल्लाप्पा चव्हाण , गरम पंचायत अध्यक्ष  दत्ता पाटील सदस्य जयराम पाटील कल्लाप्पा जाधव आणि प्रदीप पाटील उपस्थित होते .

मुक मोर्चात शिस्त महत्वाची असून ज्या प्रमाणे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मराठा मोर्चा आदर्श घेतला जातो त्याच शिस्तीच उदाहरण बेळगावातील मोर्चात दिसल पाहिजे. काही विघ्न संतुष्ट या मोर्चात गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहेत त्यामुळे हा मोर्चा प्रत्येकानं आपला स्वताचा आपल्या घरातला मोर्चा आहे अस समजून कोणत्याही गोष्टीला थारा देऊ नये. आचार संहितेचे नियम तंतोतंत पाळा अस आवाहन करत गावातून कोणत्याही प्रकारच्या चार चाकी दुचाकी न घेऊन जाता पायी चालत जाऊया असही चव्हाण पुढे म्हणाले .

कंग्राळी मुस्लीम समाजाचा पाठिंबा

या सभे दरम्यान कंग्राळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष कौसर सय्यद आणि मुस्लीम सदस्यांनी वैभव नगर आणि कंग्राळी बुद्रुक मुस्लीम समाज आणि जमात च्या वतीने पाठिंबा जाहीर करत कंग्राळी  लोकासाठी अल्पोपहार  सोय करण्याचे जाहीर केल

kangrali bk meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.