बेळगाव दि २१: शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीत जळून ख़ाक झालेलं कणबर्गी येथील घर उभारण्यास विमल फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे .
१९ फेब्रुवरी ला मठ गल्ली कणबर्गी येथील विठोबा हरलारे याचं घर शार्ट सर्किट मूळे जळालं होत घरातील मौल्यवान सामान आगीत खाक झालं होतं . विमल फाउंडेशन ने हे घर बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे . समाजातील दानशुर लोकांनी आगीत जळलेल्या वस्तु किंवा बांधकामा साठी लागणाऱ्या साहित्यासाठी मदत करावि असे आवाहन करण्यात आले आहे. . यासाठी 094831 67799 वर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.