बेळगाव दि १५ नोटीस न देता शेतकऱ्याचा ट्रकटर जप्त करणारया एल एंड टी या फायनान्स कंपनीच्या विरोधात बेळगावातील शेतकरी संघटनेसह अनेक संघटनांनी कोल्हपुर सर्कल जवळ रास्ता रोको केला .
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बसवराज कमतगी नावाच्या शेतकऱ्याचा ट्रकटर एल अंड टी नावाच्या फायनान्स कंपनीने जप्त करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता . यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सुटका केली . यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मुळगुंद, शेतकरी संघटनेचे नारायण सावंत , कृषक समाजचे सिद्धाप्पा मोदगी, सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद आदि उपस्थित होते .