बेळगाव दि २४: बेळगावच्या मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू असलेल्या महानगरपालिकेत मराठी भाषिकांची सत्ता टिकवण्यासाठी मराठी उद्योजक आणि माजी महापौर पुढे सरसावले आहेत. पालिकेत एकूण ३२ मराठी भाषिक नगरसेवक असले तरी २२ आणि दहा अशा दोन गटात ते नगरसेवक विभागले गेले आहेत.
मराठी नगरसेवकातील फुटी मुळे कन्नड आणि उर्दू गटाला महापौर उपमहापौर पदाची स्वप्ने पडू लागली आहेत .मराठी गटाच्या फुटीचा फायदा घेत नुकताच शहराच्या उर्दू भाषिक आमदाराने कन्नड उर्दू महापौर करू असे वक्तव्य केलं होतं.
शहरातील अनेक संघटना आणि कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने मराठी गटातील बेकी दूर करण्यासाठी उद्यमबाग मधील मराठी उद्योजक आणि माजी महापौर सक्रीय झाले आहेत. कारखानदारांनी नुकतीच यासंदर्भात एक बैठक घेतली असून ते दोन्ही गटाच्या प्रमुखांना भेटणार असून दोघातील वाद शमवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत तर दुसरीकडे बेळगाव नगरीचे महापौरपद भूषविलेल्या माजी महापौरांनी देखील मराठी भाषिक महापौर करण्यासाठी प्रयत्न चालविले असून भेटी गाठी करण्यास सुरुवात केली आहे. दोन गटात एकी साठी प्रयत्न करणाऱ्या माजी महापौराना आणि कारखानदाराना बेळगाव लाइव्ह च्या शुभेच्छा .. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव नगरीच्या महापौर पदी मराठी भाषिक विराजमान होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!!!