बेळगावची महानगरपालिकेची २०१३ ची निवडणूक आठवा,मराठी नगरसेवक जास्त निवडून यावेत म्हणून सीमा भागाचे नेते ठाकूर यांनी केलेले प्रयत्न आठवा, सीमा संग्राम समन्वय समिती आणि तिच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात झालेल्या एकाच मराठी उमेदवारासाठी च्या आग्रही मागणीची आठवण आली का?
आजवर तुम्ही केलेल्या प्रत्येक नालायक गिरीची पाठराखण करून सीमाप्रश्नाचा ठराव करू न देता दिलेल्या पाठिंब्याची आठवण करा, मनपा बरखास्त होऊ नये म्हणून ठराव न करण्यासाठी दिलेली खुली भूमिका ध्यानात घ्या आणि सांगा आता तुमचे गट किती?
मराठी मतांवर निवडून आलेल्या आणि आजवर फक्त आणि फक्त कमिशन वर भर दिलेल्या प्रत्येक मराठी भाषिक नगरसेवकाला हा आमचा सवाल आहे,
आज समस्त सीमाभाग बेळगाव महापालिकेचा चा महापौर कोण याकडे डोळे लावून बसलाय , या स्थितीत विरोधी बाकाला मते दिलात तर काय स्थिती होईल त्याची याचा विचार कधी करणार?
तुमचे महापौर पदासाठीचे स्वार्थ मराठी जणांना नेस्तनाबूत करून सोडतील याचे भान कोण बाळगणार? मराठी महापौर करतांना तुम्ही का आणि कशासाठी हात वर केले याची कल्पना मराठी माणसाला कायम आहे, यावेळीही तुम्ही फायदा सोडून वागणार नाही याचीही कल्पना आहेच, फायदा तर तुम्ही घेणारच इमान विकू नका हीच इच्छा आहे.
एकेकाळी बेळगाव महा पालिका सीमा प्रश्न आणि मराठी अस्मितेचे केंद्र बिंदू आणि प्रतिक होते हे अख्या महाराष्ट्रान उघड्या डोळ्यान पाहिलंय या पाच वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही मात्र मराठी अस्मितेची ऐसी कि तैसी करून सोडलात मराठी असल्याच जरा तरी भान ठेवा आणि वागा हा आमचा सल्ला आहे जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका .
सत्ताधारी गटाची एकाधिकारशाही माहित आहे, पण सारेच एक माळेतले मनी झाले तर मराठी माणसाचे काय? एक व्हा मराठी महापौर करा नाही तर जनताच तुम्हाला अद्दल घडवेल
ज्यांच्या मतावर निवडून आलात त्यांची कदर ठेवा पैसा हे सर्वस्व नव्हे इमान बाळगा , मागील काही वर्षापूर्वी ज्या पाच नगरसेवकांनी गद्दारी करून दुसऱ्या गटाला मतदान केल होत त्यांच्या घराला लोकांनी काळ फासल होत आणि त्यांना राजकारणातून निवृत्त व्हाव लागल होत हा देखील बेळगावचा इतिहास आहे हे लक्षात घ्या . राजकारनी नको प्रामाणिक लोकप्रतिनिधी बना अन्यथा पुढच्या वेळी जनता शहाणी होईल. आज जनतेला तुम्हास उपदेशाचे बाळकडु पाजण्याची वेळ आली आहे. बेळगाव लाईव्ह हे जनतेचा आवाज बनल आहे याची दखल घ्या, जर का मराठी मने,मराठी भावना दुखवाल तर पुढील निवडणुकीत नेस्तुनाबूत व्हाल !! म्हणून सांगतोय मराठी नगरसेवकांनो मराठी महापौर झालाच पाहिजे!!!
!