बेळगाव दि २१ : बेळगावच्या एक प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखिका सोनाली शाह सरनोबत यांनी दिलेल्या टिप्स महत्वाच्या आहेत. परीक्षांचा मोसम जवळ आलाय या टिप्स कानमंत्र म्हणून जोपासा असे आवाहन बेळगाव लाईव्ह च्या वतीने आम्ही करीत आहोत.
*काय करू नये….*
*1 – सकाळी उठल्या बरोबर “परिक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत” असं म्हणू नये.*
*2 – चहा नाश्ता झाल्याबरोबर लगेच “चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा” असं म्हणणं टाळावं.*
*3 – जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता ऊठतो/ऊठते हे वारंवार सांगू नये.*
*4 – लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फी चा आकडा, आई-वडीलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर ऊठता-बसता सांगू नये.*
*5 – मुलगा/ मुलगी टिव्ही समोर थोड्या वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत.*
*6 – मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास “मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो” असं खोटं सांगू नये.*
*7 – थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.*
*8 – दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.*
*काय करावे…*
*1- सर्वप्रथम शांत रहाण्याची प्रॅक्टीस करावी.*
*2 – मुलांच्या आवडीचा स्वैपाक करावा.*
*3 – मुलं अभ्यास करताना थोडं सोबत बसावं. (आपलं व्हाँटस्अँप बाजूला ठेवून)*
*4 – अधून मधून प्रेमाने “मला माहीत आहे, तू यशस्वी होणारच” किंवा “काळजी करू नकोस, मी तूझ्या सोबत आहे” असं म्हणावं.*
*5 – अभ्यासाच्या मध्ये गंमतीजंमती सांगून वातावरण हलकं-फुलकं ठेवावं.*
*6 – एखादा पेपर कठिण गेल्यास त्यावर चर्चा करत न बसता पुढच्या पेपरच्या तयारीला लागावं.*
*7 – परिक्षा संपल्यानंतर आपण कशी मज्जा करणार आहोत याची स्वप्न रंगवावीत.* .
*8 – सरतेशेवटी “हर बच्चे की अलग रफ्तार होती है” हे लक्षात ठेवावं. दहावी/बारावी ची परिक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही हे लक्षात ठेवावं.*
I like your tip’s Madam
good one
Great advice m’am