बेळगाव दि १९ : मराठी क्रांती मोर्चात मोफत वैद्यकीय सेवा बजावलेल्या डॉक्टर्स नी यापुढे देखील समाजासाठी कार्य चालूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय . उपचारात सवलत देण्य बरोबर महिन्याला एकदा आरोग्य शिबीर घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. तुकाराम बँकेच्या सभागृहात डॉक्टरची बैठक झाली यावेळी मोर्चा दरम्यान देवा बजावलेल्या डॉक्टर्स चे कौतुक करण्यात आल . मराठा समाजातील विध्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणात मागे आहेत त्यांना शिक्षणात मदत करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला . बैठकीत डॉ मिलिंद हलगेकर, डॉ दिलीप पठाडे, डॉ व्ही एन देसाई, डॉ अनिल पोटे, डॉ अनिता भांदुर्गे डॉ डी टी बामणे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी प्रकाश मरगाळे, राजेंद्र मुतगेकर,महेश जुवेकर आदि उपस्थित होते .
Less than 1 min.