बेळगाव दि ७ : अरे अरे बस के नीचे आया फिर भी बच गया … अरे अरे … ही चर्चा आर टी ओ सर्कल जवळ थांबलेल्या दोन हिंदी भाषिक मित्रातली… सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास आर टी ओ सर्कल जवळ एक सायकल स्वार …केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून ब्रेक दाबल्याने चाका खाली सापडलेला सायकल स्वार बचावल्याची घटना घडली .अपघात स्थळी ठिकाणी अचानक खूप गर्दी जमा झाली कित्येक जन बस चालकास शिवीगाळ करू लागले तर काही जण सायकल स्वाराची चूक असल्याच बोलू लागले या सगळ्या गोंधळात त्याच नाव समजू शकल नाही या जीव घेण्या अपघातातून तो बचावला केवळ आपल्या नशिबाच्या जोरावर…
Trending Now