बेळगाव दि २६ :संभाजी उद्यानात जमलेल्या हजारो शरीर सौष्ठव प्रेमींच्या साक्षीने संजय सुंठकर स्पोर्ट्स क्लबच्या तानाजी चौगुले याने आपल्या पिळदार शरीराच दर्शन घडवत मराठा युवक संघ आयोजित मानाचा बेळगाव श्री किताब पटकाविला. तर सुंठकर स्पोर्ट्स क्लब राजकुमार दोरुगडे बेस्ट पोजर म्हणून निवड करण्यात आली.
मराठा युवक संघांच्या ५१ वर्धापन दिन निमित्य बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डींग संघटना आणि संजय सुंठकर स्पोर्ट्स क्लब च्या संयुक्त विध्यमाने संभाजी उद्यानात या बॉडी बिल्डिग स्पर्धेच आयोजन करण्यात आल होत. ५५ ते ८० किलो हून अधिक अश्या सहा गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील शरीर सौष्ठव पटूनी भग घेतला होता. संजय सुंठकर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूनी अधिक विजेतेपद पटकाविली. यावेळी मुंबई हून आलेल्या किरण पाटील यांनी आपल्या शरीराच प्रदर्शन दाखवलं . यावेळी अनेक गण मान्य उपस्थित होते .