बेळगाव दि १ : संभाजी उद्यानात जमलेल्या हजारो बॉडी बिल्डिंग प्रेमींच्या उपस्थितीत संजय सुंठकर स्पोर्ट्स फौंडेशनच्या तानाजी चौगुले याने आपल्या पिळदार यष्टी आणि शरीराचं दर्शन घडवत यंदाचा महापौर श्री किताब पटकाविला तर कार्पोरेशन जिम च्या राजकुमार दोरुगडे याला बेस्ट पोजर हा किताब देण्यात आला . दरवर्षी प्रमाणे या यावर्षी देखील बेळगाव महा पालिकेच्या वतीने अनेक स्पर्धाचं आयोजन करण्यात आल आहे . विजेत्या तानाजी चौगुले यास १० हजार रुपये आणि ट्रॉफी तर राजकुमार दोरुगडे यास ३ हजार रुपये ३ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आला . महापौर सरिता पाटील , उपमहापौर संजय शिंदे यांनी बॉडी बिल्डिंग खेळाडूंना बक्षीस वितरित केलं . विविध गटात बेळगाव जिल्ह्यातील ८५ बॉडी बिल्डर्स नी सहभाग घेतला होता . अजित सिद्दण्णावर ए एम गंगाधर एम के गुरव हेमंत हावळ यांनी पंच म्हणून काम पहिले .
Less than 1 min.
Previous article
Next article