बेळगाव दि ४: जे संयोजक १९ फेब्रुवारी ला सीमाप्रश्नाच्या मागणी विरहीत मराठा मोर्चा काढणार होते त्यांनी सोमवार ६ फेब्रुवारीच्या आत पोलीस आयुक्ताकडे आपला रद्द झालेल्या मोर्चाच पत्र न दिल्यास सकल मराठा समाजान त्या संयोजकावर बहिष्कार टाकावा अशी मागणी वजा इशारा माजी नगर सेवक गजानन पाटील(गमप )यांनी दिला आहे .
१७ फेब्रुवारी बेळगावात आयोजित मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा च्या आयोजनासाठी भांदूर गल्लीतील मरगाई मंदिरात बैठकी वेळी बोलत होते . भांदूर गल्ली फुलबाग गल्ली ताशिलदार गल्ली मुजावर गल्ली पाटील मळा,कंगाळे गल्ली या भागातील सर्व गणेश मंडळ शिवजयंती मंडळ,पंच कमिटी महिला मंडळ यांची बैठक शनिवारी रात्री पार पडली . १९ फेब्रुवारी ला ज्या संयोजकांनी मोर्चा आयोजित केला होता त्यांना परवागी दिल्याच निमित पुढे करून पोलीस १७ फेब्रुवारी च्या मोर्चास परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे जे कोण मराठी मोर्चास खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे अस देखील गमापा यांनी स्पष्ट केल
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत म्हणाले की या भागातील मोर्चा दिवशी लोकांनी स्वताच्या घराला कुलूप लाऊन मोर्चात सहभागी व्हायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मोर्चा यशस्वी करायचा आहे त्यामुळे सीमा प्रश्नाला बळकटी मिळेल . बेळगाव मधल्या स्थानिक मराठी लोकांनी मोर्चात सक्रीय होण्या पेक्षा बाहेरून आलेल्या लोकासाठी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावणे गरजेचे आहे असे मत उपस्थितांनी मांडले . यावेळी शेकडो मराठी भाषिक उपस्थित होते .