बेळगाव दि २५ : बेळगाव महा पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सत्तधारी मराठी गटाने केलेल्या आवाहना प्रमाणे इच्छुकांनी महापौर सरिता पाटील यांच्याकडे अर्ज दिले आहेत.
मागास वर्ग अ महिला महापौर पदाच आरक्षण असून यासाठी संज्योत बांदेकर आणि मधुश्री पुजारी यांनी तर उपमहापौर पद साठी सामान्य आरक्षण असून राकेश पलंगे, दिनेश रावळ, मोहन भांदुर्गे आणि संजय शिंदे यांनी अर्ज दिले आहेत. दुसरीकडे नगरसेविका मीनाक्षी चिगरे यांनी दहा जणांच्या समविचारी गटाकडे अर्ज दिला आहे.
अनगोळ विभाग एकीकरण समिती बैठक
सत्ताधारी आणि समविचारी असे दोन गटात विभागल्या गेलेल्या मराठी नगरसेवकांना एकत्रित आणण्यासाठी, मराठी भाषिक महापौर उपमहापौर करण्यासाठी शनिवारी अनगोळ विभाग एकीकरण समितीची बैठक झाली आहे . अनगोळ भागातील सगळ्या नगरसेवकांना बोलावून मराठी भाषिक महापौर उपमहापौर करा अस आवाहन करण्यात आल आहे . सत्ताधारी आणि समविचारी अशी दोन्ही गटातील अनगोळ भागातील नगर सेवकांची वेगवेगळी बैठक घेण्यात आली मराठी महापौर करा अशी सूचना करण्यात आली आहे . तर उद्योजक वकील आणि माजी नगरसेवकांची एक बैठक मराठा मंदिरात पार पडली या बैठकीत देखील दोन्ही गटांना एकत्रित बसवून मराठी महापौर करण्याचे ठरविले आहे