बेळगाव दि २६; गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी शिवाजी ट्रेल संस्थेतर्फे देशातील १२१ किल्ल्यांचे राजघराण्यातील व्यक्तीच्या हस्ते पूजन करण्यात आले . त्याचा एक भाग म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले .
युवा पिढीला गड किल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्यांनी संवर्धनासाठी कार्य करावे म्हणून देशभरातील किल्ल्यांचे पूजन करण्यात आले आहे . निपाणीकर सरकार यांच्या हस्ते भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन करण्यात आले . या संस्थे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्याचे पूजन एकाच वेळी केले जाते. यामध्ये बेळगाव च्या भुई कोट किल्ल्याची पूजा करण्यात आली .यामध्ये जम्मू,पंजाब, दिल्ली.राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,दमन,व इतर ठिकाणी आयोजित केली आहे. निपाणीकर सरकार याना बेळगाव च्या किल्ला पूजनाचा मान आहे.याप्रसंगी लष्करी जवान ,कार्यकर्ते उपस्थित होते . शासनाने गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन निपाणीकर सरकार यांनी याप्रसंगी केले . यावेळी युवराज सिद्धोजीराजे,गुणवन्त पाटील,सुनील जाधव उपस्थित होते. दुर्गादेवी मंदिराचे पुजारी शर्मा यांनी पौरोहित्य केले.