बेळगाव दि ५ : बेळगावातील मराठा मंदिर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ मॅरेथानला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .रेल्वे ओव्हरब्रीज जवळील मराठा मंदिर येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला . पोलीस उपायुक्त जी . राधिका यांनी ध्वज दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन नितीन धोंड उपस्थित होते .
मुलींच्या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली . तर महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली . मराठा मंदिरतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . जिल्हा ऍथलेटिक संघाचे सहकार्य स्पर्धेला लाभले . मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या पाच सहा वर्षाच्या मुलीपासून महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता . राजमाता जिजाऊंचे कर्तृत्वाचे साऱ्यांना स्मरण व्हावे . त्यांचा आदर्श तरुणी आणि महिलांनी आपल्या समोर ठेवावा . बेटी तो देश कि शान है, आपका सन्मान है हा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केल्याची माहिती अप्पासाहेब गुरव यांनी दिली.
विजेत्यांची ना १७ वर्ष खालील गट :पूजा गंगापुरे ,ऐश्वर्या करीगर रोहिणी पाटील,
१२ वर्ष खालील गट: भक्ती पाटील ,नम्रता हावळे ,ऋतुजा जाधव
महिला गट :शर्मिला ,श्रद्धा नेसरकर, अंजली पावशे
१४ वर्षाखालील गट :पूर्वा शेवाळे ,शेफाली जांभळे ,श्रावणी भाटे
खुला गट मुली :प्रणाली जाधव ,करिष्मा शेख ,मयुरी पिंगट