बेळगाव दि १९:कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला सोमवार दि, 20 रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांच्या खुनामागील सूत्रधारांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव मार्ग, मराठी पत्रकार संघ, जायंट्स ग्रुप मेन संघटनांच्यावतीने सकाळी 7 वाजता संभाजी चौकातुन ‘निर्भय फेरी” काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता गिरीष कॉम्प्लेक्समधील भगतसिंग सभागृहात सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Less than 1 min.