belgaum

३२ मराठी नगरसेवक एकत्रित अज्ञात स्थळी

0
198
City corporationbelgaum
 belgaum

बेळगाव दि २८:गेले काही दिवस एकत्रित रित्या बसून चर्चा सुद्धा करायला टाळाटाळ करणारे, मानापानाचे निमित्य करून चर्चा करण्यास देखील मागे पुढे करणारे ३२ मराठी नगरसेवक अखेर एकत्र जमले आहेत.महापौर उपमहापौर निवडीच्या एक रात्र आधी सगळे ३२ नगरसेवक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जवळील एका रेसोर्ट मध्ये एकत्र वास्तव्यास आहेत.

सत्ताधारी गटातील  २३ नगरसेवकांचा एक गट अगोदर रवाना झाला होता त्या नंतर दुसऱ्या समविचारी गटातील ९ नगरसेवक रात्री ८ च्या दरम्यान याच अज्ञात स्थळी पोचले आहेत. रात्रभर बैठक होऊन ३२ नगरसेवकात चर्चा होऊन महापौर उपमहापौर निवड केली जाणार आहे. गेल्या काही दिवसपासून उद्योजक, युवा कार्यकर्ते,पंच मंडळी आणि माजी नगरसेवकांच्या मुळे निर्माण झालेल्या दबाव गटातून ३२ नगरसेवक एकत्र आले आहेत .

बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व नगरसेवक पालिकेत दाखल होणार असून शेवटच्या क्षणी मराठी गटातून  महापौर उपमहापौर उम्मेद्वार कोण असणार हे ठरणार आहे .पदासाठी भांडणाऱ्या नगरसेवकाचे रुसवे फुगवे काढणे त्यांना एकत्रित बांधून ठेवणे हे मुख्य काम वरिष्ठ नगरसेवकांच नेत्यांच असणार आहे त्यामुळे मराठी नेतृत्वाची खरीकसोटी उद्या दिसणार आहे .

 belgaum

mahapalika building

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.