बेळगाव दि १०:सीमाभागात मराठा समाज विखुरलेला आहे त्यामुळेच इतर लहान लहान समाज हावी होत आहेत अनेक खोट्या गुन्हे पडत आहेत जर का मराठे एकत्र आले तर नक्कीच भविष्यात इतिहास घडेल आणि त्यामुळे सीमा प्रश्नाची देखील तड लागण्यास वेळ लागणार नाही अस स्पष्ट मत मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी काढले .
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील आमराई मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा जनजागृती बैठक आणि नूतन ए पी एम सी सदस्य आप्पा जाधव यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शहर एकीकरण समितीचे टी के पाटील,शेतकरी संघटनेचे नारायण सावंत,वाय बी चौगुले,मनोज पावशे, शिवाजी सुंठकर, मदन बामणे महादेव पाटील यांच्यासह बिजगर्णी, बेळगुंदी भागातील शेकडो मराठी भाषिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अट्रो सिटी असुदेत किंवा इतर कोणताही कायदा असुदेत खोटा मराठा समाज म्हणून जर का एकत्रित असाल तर कुणीही खोटी केस करायची हिम्मत करणार नाही आम्ही विखुरलेले आहोत म्हणून याचा सगळेजण गैर फायदा घेत आहेत त्यामुळे मोर्चा नंतर देखील आपण युती एकी टिकून ठेवूया असे देखील गडकरी पुढे म्हणाले .