`बेळगाव दि ६ : १७ फेब्रुवरी ला बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा ला पोलीस परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ फेब्रुवारीला मोर्चा ची परवानगी मागितलेल्या जुन्या संयोजकांनी अखेर माघार घेत अधिकृत रित्या पोलीस प्रशासनाला पत्र दिल्याने पोलीसाकडून १७ फेब्रुवारी च्या मोर्चाला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात मनोहर देसाई यांच्या नेतृत्वात जुन्या मोर्चा संयोजकांनी पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांची भेट घेतली आणि अधिकृत रित्या आपण मागितलेली परवानगी रद्द करावी अस पत्र दिल .यावेळी जयराज हलगेकर, रमाकांत कोंडुसकर, अनंत लाड ,सुनील चौगुले,अरुण कटाम्बळे,अभिजित चव्हाण,रमेश गोरल युवराज हुलजी ,अरुण माने यांच्यासह एकूण ११ जुने मोर्चा आयोजक उपस्थित होते.
गेल्या ७ दिवसापूर्वी जुन्या आयोजकांनी आपला मोर्चा रद्द करत १७ च्या मोर्चाला पाठींबा देणार अस जाहीर केल होत मात्र पोलिसाकडे लेखी स्वरुपात परवानगी मागितली होती त्याच रद्द केलेले पत्र अध्याप दिल नव्हत. त्यामुळे१७ फेब्रुवारी च्या सकल मराठा समाजाच्या मोर्चास पोलीस दल १९ च्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते मात्र आता जुन्या आयोजकांनी माघारीच पत्र दिल्याने मराठा मोर्चास परवानगी मिळू शकते अस चित्र आहे . यावेळी सकाळ मराठा संयोजक प्रकाश मरगाळे, राजेंद्र मुतगेकर देखील हजर होते .
बेळगाव लाइव्ह ने सोशल मिडिया वाचका साठी माघारीच पत्र देखील अपलोड केल आहे .
विकास कलगटगी यांचे प्रयत्न
जुने आयोजक मोर्चाच माघारी पत्र देण्यास टाळाटाळ करत होते गेले चार दिवस हा हाय होलटेज ड्रामा पोलीस आणि मोर्चा वर्तुळात सुरु होता . शनिवार पासून दोन्ही गटाच्या सदस्यांची मनधरणी करणे आणि पोलीस आयुक्ताकडे फॉलोअप करणे याच काम मोर्चा संयोजकांनी जिला प्रशासन आणि पोलीस परवानगीची जबाबदारी विकास कलघटगी यांच्यावर सोपविली होती त्याच सार्थक करत विकास यांनी दुसऱ्या गटाला पत्र देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे . यावेळी झालेल्या बैठकीत खुद्द् पोलीस आयुक्त भट्ट यानी देखील कलगटगी यांच्या कार्याच कौतुक केल आहे .
एक मराठा लाख मराठा बेळगावचा मराठा
मि येणार तुम्हीही या