बेळगाव दि ७ : बेळगावातील मराठा क्रांती मोर्चा आता १७ एवजी १६ फेब्रुवारी ला होणार आहे . मराठा मोर्चा च्या संयोजकांना बेळगाव पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी अखेर विना अट परवानगी दिली आहे मात्र मोर्चाची ची तारीख १७ हून १६ करण्यास भाग पाडले आहे .
सोमवारी सायंकाळी क्रांती मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे राजेंद्र मुतगेकर आणि विकास कलगटगी यांच्या सह प्रतिनिधी मंडळान तब्बल २ तास पोलीस आयुक्ताशी चर्चा केली अखेर पोलीस आयुक्तांनी १६ फेब्रुवारी विना अट मराठा मोर्चा ची परवानगी दिली आहे . मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे यांनी बेळगाव लाईव्ह ला दिलेल्या माहितीत सांगितले की पोलिसांनी आम्ही मागितलेला जुना म्हणजे मार्ग अंतिम केला मात्र १७ एवजी १६ फेब्रुवारी तारीख दिल्याने आम्ही गुरुवार १६ फेब्रुवारी मोर्चा अंतिम केला आहे . पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चा पुढील महिन्यात घ्या २० फेब्रुवारीला घ्या १६ किंवा १८ फेब्रुवारी परवानगी घ्या १७ ला परवानगी देण्यास तांत्रिक अडचण आहे अशी भूमिका मांडल्यावर आम्ही मोर्चाची तारीख १६ फेब्रुवारी केली आहे असे ते म्हणाले . सोमवारी रात्री पोलीस दलाची एक टीम मोर्चा च्या मार्गाची पाहणी करणार अशी माहिती उपलब्ध झाली आहे . आता मोर्चा संभाजी उद्यानातून सुरुवात होऊन उड्डाण पूल नरगुंदकर भावे चौक मारुती गल्ली , रामदेव गल्ली समादेवी गल्ली आणि संभाजी चौक असा मोर्चा अधिकृत मार्ग असणार आहे .