Friday, December 27, 2024

/

दोन चोरट्याना अटक

 belgaum
बेळगाव ,दि . २५-शहर गुन्हे अन्वेषण शाखेने दोन चोरट्याना  अटक करून त्यांच्याकडून एकवीस लाख रु . हुन अधिक किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त टी . जी . कृष्णभट्ट यांनी पत्रकार परिषदेत दिली .
robbery.3
 शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बी . आर . गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली . संशयास्पदरित्या दोन व्यक्ती फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरातील अनेक भागात चोऱ्या केल्याची कबुली दोघा चोरटयांनी दिली . गणेश सुरेश टुबाकी (२४) ,सुतगट्टी ,ता. बैलहोंगल आणि निलेश लक्ष्मण बडवानजी (२४),महाद्वार रोड ,बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत . चोरट्याकडून २१. ६५ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वीस लाख रु . च्या सोन्याच्या दागिन्यांचा आणि  पंचेचाळीस हजार रु . च्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.