Friday, December 27, 2024

/

दुर्मिळ जातीचे घुबड आणि बिबट्याचे कातडे विकणारे गजाआड

 belgaum

बेळगाव ,दि . २३-दुर्मिळ जातीचे वटवाघूळ विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना आणि बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या दोघांना शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गुदिकोप्प यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एकूण सहा जणांना अटक केली . त्यांच्याकडील दुर्मिळ जातीचे घुबड  आणि बिबट्याचे कातडे देखील पोलिसांनी जप्त केले आहे .

leop-skin
रविवारी राष्ट्रीय महामार्गावर सुवर्णसौध येथे चार व्यक्ती दुर्मिळ जातीचे घुबड विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाल्यावर शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टोयोटो शोरूम जवळ चार जणांना अटक केली . यावेळी त्यांनी बॉक्समधून घुबड विकण्यासाठी आणल्याचे कबूल केले . सलीम मुबारक अली (३८),जे . पी . नगर ,कोप्पळ ,राघवेंद्र प्रसाद पै (२८),जे . पी. नगर ,कोप्पळ ,नारायण गणपती शेट्टी (५०),हुलीकट्टी आणि बस्सू पाटील ,हावेरी याना दुर्मिळ घुबड प्रकरणी अटक केली आहे .
त्याच दिवशी संध्याकाळी किल्ल्यातील दुर्गामाता मंदिर येथे दोन व्यक्ती बिबट्याचे कातडे विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यावर शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना अटक करून बिबट्याचे कातडे जप्त केले . या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात नोंद झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.