बेळगाव दि २९ : माझ्या घरात आणि कार्यालयात आयकर खात्याच्या धाडीत तीन लाखापेक्षा अधिक रोख रक्कम सापडली तर मंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देईन आणि राजकीय सन्यास घेईन अस उत्तर राज्याचे लघु उद्योग आणि पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिल आहे .
गेल्या आठवड्यात बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह महिला प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यसह एकूण ५ कॉंग्रेस नेत्यांच्या कार्यालये आणि घरावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या . उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पशव भूमीवर पंत प्रधान मोदी यांनी माझी बद्दल वक्तव्य केल आहे त्यांना पाच राज्याच्या निवडणुकीत पराभव दिसत आहे त्यामुळे त्यांनी आयकर धाडी निमित पुढ केल आहे असही जारकीहोळी म्हणाले . माझी मंत्री पदी निवड झाल्या वर भाऊ सतीश जारकीहोळी यांनी माझी भेट घेतली होती आणि अभिनंद केल होत गेल्या २० वर्षात आम्ही सामोरा समोर दोघेही बोललो नव्हतो कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून जेंव्हा कुटुंबाचा विषय येतो त्यावेळी आम्ही सर्वे जन एकच आहे असा टोला हि जारकीहोळी यांनी लगावला .