बेळगाव दि ३१ : बेळगाव शहरातील सर्वात जून आणि प्रसिद्ध असलेल्या बसवाणेप्पा ब्यांड चे मालक आणि मुख्य मास्तर शंकरराव बसवाणी बागेवाडी वय (८०) वर्ष यांच निधन झाल आहे . गणेश जयंतीच्या निमित्तान ते गोवा येथील म्हापसा येथे ब्यांड वाजवण्यासाठी गेले असता दुपारी १ :३०च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्यान त्याचं निधन झाल आहे .
बसवाणेपपा हे बेळगाव शहरातील सर्वात जून ब्यांड कंपनी असून याची स्थापना १९१२ साली झाली होती या बंड कंपनी बद्दल सर्व राजकीय सामाजिक आणि धार्मिक लोकातून आदराची भावना आहे . बेळगाव नव्हे तर कोल्हापूर गोवा सांगली आणि कोकण भागात देखील बसवाणेपपा बंड ला मागणी आहे . आज ही सुमारे २० हून अधिक कुटुंब या ब्यांड कंपनी द्वारे उदार निर्वाह करत आहेत बसवाणी परिवाराच्या पाच पिढ्या ब्यांड एकत्र कुटुंब व्यवसाय होते . अभिनेते कै राज कपूर ,लता मंगेशकर ,कै यशवंतराव चव्हाण ,कै बी डी जत्ती , कै मारुती माने या सारख्या अति महनीयानी वाहवा मिळविली होती . बसवाणेपपा परिवारच ब्यांड सक्षमपणे चालवण्यात शंकरराव बागेवाडी यांचा सिंहाचा वाटा होता अश्या या बेळगावच्या संगीत क्षेत्रातल्या अवलियास बेळगाव लाईव्ह च्या वतीने मन पूर्वक आदरांजली ……
Basvaneppa band very best band in Belgaum City.