बेळगाव दि २९ : महापौर निवडणुकीची तयारी महापलिकेच्या कौन्सिल विभागान सुरु केली आहे .विध्य्मान महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांच्या कार्यकालाची मुदत ४ मार्च रोजी संपणार असून लवकरच प्रादेशिक आयुक्त महापौर पदाची तारीख जाहीर करणार आहेत .
यंदाच महापौर पद इतर मागास अ महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असून उपमहापौर पद सामान्य पदासाठी खूल आहे . २०१८ साली महापालिका निवडणुका होणार असल्याने यावर्षी च महापौर पद हे या सभागृहातील शेवटच महापौर पद असणार आहे .यावर्षीच्या महापौर पदासाठी विरोधी पक्षा कडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाली आहे पालिकेची बरखास्ती टाळण्यासाठी पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या माध्यमातून विरोधी गटाने प्रयत्न केले होते त्यामुळे सत्ताधारी गटातील नाराज गटाला जवळीक साधून महापौर पद आपल्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . सत्ताधारी गटातील नाराज नगर सेवक कोणत्या गटाला मदत करणार यावर कोण महापौर बनणार हे निश्चित आहे .सत्ताधारी गटातील मधुश्री पुजारी ,संज्योत बांदेकर तर नाराज गटातील मीनाक्षी चिगरे या महापौर पदासाठी तर नाराज गटातील मोहन बेळगुंदकर आणि नागेश मंडोळकर हे उपमहापौर पदासाठी इच्छुक असून लॉबिंग देखील करत आहेत .