बेळगाव दि ३१ सकल मराठी आणि मराठा क्रांती (मूक) मोर्चा येत्या 17 फेब्रुवारी रोजी बेळगावात निघणार आहे.
या मोर्चा संदर्भात कार्यकर्त्याकडून सुचना घेऊन तयारी करण्यासाठी आज सोमवार ता 30 रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यानी वेगवेगळ्या सुचना केल्या .
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने बेळगावच्या बाहेरून येणार्या जनतेसाठी कार व मोटर पार्किंग फार महत्वाचे आहे.
तेंव्हा आयोजकांना फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे नियोजन करावे लागेल.
यासाठी आपण काय केले पाहिजे
1) शहर आणि तालुक्यातील नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यानी गटतट विसरून व मनाचा मोठेपणा दाखवून एकदिलाने सहभागी झाले पाहीजे.
2) ज्याना ज्याना जिथे नेमतील त्याच ठिकाणी थांबयचं आहे
3) याासाठी वेगवगळ्या कमिट्या कराव्यात.
4) या कमिट्यासाठी वेगवेगळा ड्रेसकोड करावा
5) मोर्चाच्या मार्गावर पाण्याची सोय करावी
6) शुगर , बीपी असणार्यानी आपापली औषधे बरोबर घ्यावीत
7) लहान मुले असतील तर त्यांच्या खिशात पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर , लिहून तो कागद ठेवावा
8) मोर्चाच्या मार्गावर सुचना देण्यासाठी माईकची सोय करावी.
तर यासाठी प्रत्यकांने आपापला “इगो” बाजूला ठेऊन कार्य करावे
तरच हा मोर्चा यशस्वी होणार आहे एक मराठा , लाख मराठा
/
मोर्चामधील प्रमुख मागण्या सर्वसमावेशक रहात त्याची त्वरित पुर्तता होण्यासारख्या असाव्यात.
स-सर्वांचा
क-कळवळा असणारा
ल-लढवय्या.
सकल-मराठा-मराठी क्रांती मुक मोर्चा, बेळगाव.