बेळगाव दि २९ : बेळगाव प्रश्नी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी स्वताच्या मालकीचा असलेला पाठीम्ब्याचा शब्द कधीच दिला नाही अशी खंत व्यक्त करत तामिळनाडू मध्ये जल्लीकटू वरून देश पेटला सगळे एकत्र आले मात्र मराठी साहित्यिकांना सीमा लढया बद्दल बोलायची लाज का वाटते असा प्रश्न मासिक जडण घडण संपादक सागर देशपांडे यांनी व्यक्त केली आहे .
बेळगावातील मराठी भाषा संस्कृती संवर्धन करण्यासाठी मराठी संवर्धन मंडळाच्या वतीने दरवर्षी फिरते चौथ मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनाच आयोजन करण्यात आल होत . आंबेवाडी गावात हे संमेलन आयोजित करण्यात आल होत यावेळी मासिक जडण घडण पुणे संपादक सागर देशपांडे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .महाराष्ट्रातील साहित्यिका कडून सीमा भागातील मराठी साहित्यिक , कवी , एकांकिका ,संस्कृती कादंबरी , लोककला यांचा उल्लेख केला जात नाही . घरात पोलीस नाहीत म्हणून पोलिसाकडून जनावरांना मार बडव केली जाते या बद्दल महाराष्ट्र गप्प का असा सवाल देखील केला .
सकाळ च्या उद्घाटन सत्रात आकर्षक अशी ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये हजारो महिला युवक कार्यकर्ते आणि विध्यार्थिनी पारंपारिक मराठी वेशभूषे सह सहभागी झाले होते . बेटी बचाव आणि शिवाजी महाराजांच्या चित्र रथ देखील सभागी झाले होते . हजारो महिला डोक्यावर कळस घेऊन दिंडी आकर्षण वाढवत होत्या