Friday, March 29, 2024

/

शंकर मुनवळळी बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस बुधवार पासून सुरुवात

 belgaum

बेळगाव दि ३१: इंडियन क्रिकेट लीग च्या धर्ती वर बुधवार पासून बेळगाव प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेस युनियन जिमखाना मैदानावर सुरुवात होणार आहे .युनियन जिमखाना चे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली . १ ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे कॉंग्रेस नेते शंकर मुनवळळी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत

या स्पर्धेच हे चौथे वर्ष असून कर्नाटक क्रिकेट असोसिएशन ने या स्पर्धेस मान्यता दिली आहे एकूण १७ संघ या स्पर्धेत भाग घेणार असून विजेत्या संघास १ लाख २५ हजार रुपये तर उपविजेत्या संघास ७५ हजार रुपये तर मालिकावीर म्हणून होंडा दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे . या शिवाय सामनावीर सह अनेक आकर्षक बक्षीस आयोजित ठेवण्यात आली आहेत . रणजी खेळाडू दीपक चौगुले ,रोहन कदम सह झीशान सय्यद हे खेळाडू देखील या स्पधेत खेळणार आहेत . पत्रकार परिषदेवेळी कॉंग्रेस नेते शंकर मुनवळळी, युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर ,बाबूलाल बागवान देखील उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.