बेळगाव लाईव्ह
काय आहे बेळगाव लाईव्ह
हे आहे एक ऑनलाईन व्यासपीठ. प्रत्येक बेळगावकराचं, खुला आणि मुक्त आवाज, हे असेल माहिती आणि बातम्यांचं एक पोर्टल. जे काही घडेल ते चटकन आणि पटकन जसं घडलंय अगदी तसंच यामध्ये पहायला मिळेल. जे जे वाईट आहे त्याच्या विरोधात आणि जे जे चांगले आहे त्याच्या बाजूने हे पोर्टल काम करेल, कोणाच्याही विरोधात नाही आणि कोणाच्याही बाजूने नाही या तत्वावर बातमीच्या आतील बातमी शोधणे हा पहिला प्रयत्न राहील
जाहिरातीचीही सोय
या पोर्टल च्या माध्यमातून समस्त बेळगावकारांच्या घरा घरात, प्रत्येकाच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट आणि संगणकावर बातमी मिळू शकेल. आणि यामुळेच उद्योजक , व्यापारी वर्गाला तसेच नव्याने उद्योग धंद्यात येऊ इच्छिणाऱ्यांना याद्वारे आपली जाहिरात देऊन आम्ही लाखो माणसांपर्यंत नक्कीच पोहोचवू शकू.
मोहिमा आणि अभियानांना साथ
बातमीदारी आणि पत्रकारितेचे प्रमुख ध्येय आहे ते अन्यायाविरोधातला आवाज होणे. या माध्यमातून आम्ही असाच अनेकांना त्यांच्यावरील अन्यायाला विरोध करण्यासाठी आवाज देऊ. सर्व प्रकारच्या मोहीम, मोर्चे, आंदोलने आणि अभियानांना बेळगाव लाईव्ह ची समर्थ साथ राहील.
लेखक कविना संधी
हे एक व्यासपीठ आहे लेखक आणि कविंसाठी, व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे, आमच्या संपादकीय मंडळाच्या सल्ल्याने निवडक आणि प्रसिद्धीस योग्य असलेले साहित्य आम्ही नक्कीच प्रसिद्ध करू, नव्हे ऑनलाईन झळकवू……..
चला तर मग
तय्यार राहा
बेळगाव लाईव्ह
च्या नव्या पर्वाला