बेळगाव दि २८ : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी दहा मार्च रोजी होणाऱ्या महत्वपूर्ण सुनावणी बाबत पुढील कामकाज बाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असे आश्वासन देत न्यायालयीन कामकाजाचा आढावा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतला
कोल्हापूर येथील हॉटेल पंचशील येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळान शरद पवार यांची भेट घेतली आणि कोर्ट कामकाजाबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी मागील सुनावणीची बद्दल चर्चा करून जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी केलेल्या युक्तिवादाची सविस्तर माहिती दिली यावेळी साक्षी दारांच्या प्रतीज्ञा पत्राबद्दल काय चालले आहे याचा आढावा घेतला. शरद पवार याना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल एकीकरण समितीच्या वतीन पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आल .यावेळी आमदार अरविंद पाटील , माजी आमदार मनोहर किणेकर , प्रकाश मरगाळे, दिगंबर पाटील ,दीपक दळवी ,मालोजी अष्टेकर ,निन्गोजी हुद्दार , जयराम मिरजकर आणि सुनील आनंदाचे उपस्थित होते