बेळगाव दि 28 : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद यांना संगणकीय उतारा करुण देण्यासाठी अडीच हजारांची लाच मागितल्यान पति महावीर हुडेद यांच्यासह तुरुंगाची हवा सोसावी लागली आहे .
एन्टी करप्शन ब्यूरो (ए सी बी) अधिकाऱ्यांनी शनिवारी मच्छे ग्राम पंचायती च्या अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांना 2500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकड़ले आहे आणि अटक केलीएन्टी करप्शन अधिकारी विश्वनाथ कब्बूर आणि सहकाऱ्यानी ही कारवाई केली . मच्छे अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांनी संगणक उतारा देण्यासाठी या गावातील कस्तूरी कोलकार यांच्या कडुन अडीच हजारांची लाच मागितली होती या माहिती द्वारे भ्रष्टाचार विरोधी पथकाने ही कारवाई करत कर्नाटक लाच लुचपत कायद्या अंतर्गत कारवाई करत ग्राम पंचायत अध्यक्षा आणि त्यांचे पति महावीर हुडेद यांची तुरुंगात रवानगी केली .
सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजीत मूळगुंद आणि मानवाधिकार संघटनांनी ग्राम पंचायत मधील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेत . बेळगाव तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीततील भ्रष्टाचार कमी होईल का ? हा महत्वाचा प्रश्न आहे