Friday, April 26, 2024

/

स्टार एअर ने कमी केल्या विमानफेऱ्या

 belgaum

फेब्रुवारी पासून बेळगावमधून विमानसेवा सुरू केलेल्या स्टार एअर या कंपनीने आता आपल्या विमानसेवा कमी केल्या असून आठवड्यात फक्त 5 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. 31 मार्च पासून हा बदल होणार आहे.

सध्या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ही सेवा असून 1 एप्रिल नंतर त्यावर मर्यादा येणार आहेत.आणखी नवीन मार्गांची घोषणा करण्यासाठी आता बंगळूर साठीची सेवा कमी केली जात असल्याची शक्यता आहे.

Star air

 belgaum

कंपनीने आपल्या वेबसाईटवर अहमदाबाद साठी विमान सुरू करणार असे जाहीर केले असले तरी ते कुठल्या विमानतळावरून हे स्पष्ट केलेले नाही.मात्र या अगोदर स्टार एअर चे मालक संजय घोडावत यांनी बेळगाव अहमदाबाद सुरू करू असे सूतोवाच्य केले होते त्यामुळे  वरील अहमदाबाद ची विमान सेवा बेळगाव हुन असू शकते.

एअर इंडिया ने सुद्धा आपल्या विमानसेवेत 26 मार्च नंतर आपल्या वेळापत्रकात बदल सुचवले असून ते काय असतील याकडे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.