Wednesday, May 8, 2024

/

‘शॉक लागून निलजीतील महिला ठार’

 belgaum

नळाला पाणी आलंय म्हणून मोटार सुरू करायला गेलेल्या महिलेला शॉक लागल्याने ठार झाल्याची घटना निलजी ता.बेळगाव येथे सोमवारी दुपारी घडली आहे.
आरती किरण शिंदोळकर वय 32 असे या घटनेत ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आले.

या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार..आरती या रामदेव गल्ली निलजी येथील आपल्या घरात नळाला पाणी आलंय म्हणून मोटार सुरू करतेवेळी करंट लागल्याने अत्यवस्थ झाल्या होत्या, लागलीच उपचारासाठी त्यांना सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचं निधन झालं आहे.

मयत विवाहित महिलेच्या पतीचे नाव किरण शिंदोळकर असून ते फर्निचर फ्रेंच पॉलिश चे काम करतात.मयत महिलेस दोन आणि चार वर्षाची चिमुरड्या मुली आहेत. इतक्या लहान वयात त्या दोघी मुलींना आईच छत्र हरपलं असल्याने निलजी गावात तळमळ व्यक्त होताना दिसत आहे.

 belgaum

या प्रकरणी मारिहाळ पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.